दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ₹1 Lakh शिष्यवृत्ती
उडान शिष्यवृत्ती योजना
हा एक अनोखा शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे जो विशेषत: उच्च शिक्षणाची आकांक्षा असलेल्या अपंग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे. ही शिष्यवृत्ती महाराष्ट्रातील निवडक अपंग विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी दिली जाईल. हा सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गतचा SKF India, Sandvik आणि Atlas Copco या स्वीडिश कंपन्यांचा सहयोगी प्रकल्प आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग वाढवणे आणि उच्च शिक्षणात समान संधी मिळवून देणे आहे. उच्च शिक्षणामध्ये अपंग विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. काही आकडेवारीनुसार हे प्रमाण फक्त 0.20% एवढे कमी आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये तर याहून कमी प्रमाण आहे. ही गरज लक्षात घेऊन GSP INDIA च्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे . प्रत्येक लाभार्थ्याला 100% शैक्षणिक सहाय्य, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, क्षमता निर्माण, करिअर समुपदेशन आणि संपूर्ण सहयोग यांचा समावेश होतो. हा कार्यक्रम ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या 42 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेद्वारे चालवला जातो.
शिष्यवृती वैशिष्ट्ये
-
संपूर्ण शैक्षणिक सहाय्य
-
एक लाखापर्यंत आर्थिक तरतूद
-
मार्गदर्शन, क्षमता बांधणी आणि करिअर समुपदेशन
-
गरजेनुसार सहाय्यक उपकरणे
नाव नोंदणीची अंतिम तारीख
विद्यार्थी नोंदणी
1५ जुलै २०२४
पात्रता निकष
-
केवळ दहावी आणि बारावी पूर्ण केलेले अपंग विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
-
कोणत्याही लिंग श्रेणीतील अपंग विद्यार्थी अर्ज करू शकतात.
-
वार्षिक उत्पन्न अडीच ते तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
-
केवळ १६ ते ३० वयोगटातील विद्यार्थी अर्जासाठी पात्र आहेत
-
ज्या विद्यार्थ्याना ११ वी किंवा डिप्लोमा किंवा पदवीचे पहिले वर्ष यांसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे असे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात.
-
व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
-
तुम्ही ११ वी किंवा डिप्लोमाला प्रवेश घेतला असेल तर १० वी मध्ये कमीत कमी 60% गुण आवश्यक आहेत.
-
तुम्ही पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला असेल तर १२ वी मध्ये कमीत कमी ६०% गुण आवश्यक आहेत
