SKF
Scholarship Programme for the Girls of Marathwada region
SKF India Ltd. initiated the SKF Scholarship Programme for the Girls of Marathwada region in the year 2017. It is part of SKF's Corporate Social Responsibility initiatives.
Grameen Shramik Pratishthan is the official Implementation partner of this Scholarship Programme for Marathwada Region.
Annually 40-50 deserving girls from underprivileged background are selected through a well structured selection process. Currently 132 girls are supported under this programme.
Apart from the financial support, holistic development of girls is an important component. Girls are provided with personality development, life skill development and career development guidance inputs through the training workshops and individual mentoring sessions.

SKF India Ltd. कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायीत्व कार्यांतर्गत मराठवाडा विभागातील गरीब, गरजू, होतकरू मुलींसाठी SKF युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवत आहे. ग्रामीण श्रमीक प्रतिष्ठान या प्रकल्पाची मराठवाडा विभागात अंमलबजावणी करणारी प्राधिकृत सहयोगी संस्था आहे.
निवड झालेल्या मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केला जातो.
या शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्यासाठी तीन मुख्य पात्रता अटी आहेत.
१. अर्जदार मुलगी मराठवाडा महसुली विभागात कायम वास्तव्य करणारी असावी.
१. अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड (१.५ ) लाख पेक्षा कमी असावे. ही शिष्यवृत्ती गरीब कुटुंबातील होतकरू मुलींसाठी आहे.
३. अर्जदार युवती विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ इच्छीत असल्यास इयत्ता दहावीत (X), मान्यताप्राप्त बोर्ड परीक्षा-20 च्या निकालानुसार किमान 85 % तर कला व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश इच्छुकांस किमान 75 % गुण प्राप्त असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने www.udaan.skfindiacsr.com या संकेतस्थळावर भरावयाचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी प्रथम नोंदणी करून आपले User Account बनवावे.नंतर लॉगइन करून अर्ज भरावयाचा आहे.
अर्ज कसा भरावा याचा व्हिडिओ संकेतस्थळावर ( वेबसाईट ) वर दिला आहे. तो आपण या लिंक Video Link वरून पण पाहू शकता.
संकेतस्थळावर सर्व योजनेची सर्व माहिती दिली आहे. अर्ज करण्यासाठी कसलेही शुल्क नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर, प्रत्यक्षपणे कुठेही अर्ज दाखल करण्याची गरज नाही. ( शक्य असल्यास अर्जाची एक प्रिंट स्वत:जवळ ठेवा )
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
१२ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी संपर्क:
मो. 8554 83 0064
ग्रामीण श्रमीक प्रतिष्ठान, लातूर
( प्राधिकृत प्रकल्प अंमलबजावणी संस्था )
SKF युवती शिष्यवृत्ती कार्यक्रम कार्यालय
तिसरा मजला' LDCC बँकेच्या वर राजीव गांधी चौका जवळ, औसा रोड लातूर.
जिल्हा लातूर
इमेल - udaan.skf@gmail.com
