महाराष्ट्रातील अस्थिव्यंग युवक व युवतींसाठी !
डिजिटल मिडिया कंटेंट डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रम
महाराष्ट्रातील १० वी पास अस्थिव्यंग युवक व युवतींसाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान डिसेंबर २०२१ पासून डिजिटल मिडिया कंटेंट डेव्हलपमेंट हा ४ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम चालवत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील अस्थिव्यंग युवक व युवतींना डिजिटल कौश्यल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे आहे.
प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य :
प्रशिक्षण हे निवासी व पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षणामध्ये खालील गोष्टी शिकवल्या जातात.
१. बेसिक ते अॅडव्हान्स ग्राफिक डिझाईन कौशल्य
२. व्हिडिओ एडिटिंग कौशल्य
३. सोशल मिडिया मॅनेजमेंट कौशल्य
४. वेबसाईट डेव्हलपमेंट कौशल्य
५. इमेल मार्केटिंग कौशल्य
प्रशिक्षण घेण्यासाठी खालील मुख्य पात्रता अटी आहेत.
१.अर्जदार हा अस्थिव्यंग पाहिजे
२. अर्जदार हा कमीत कमी १० वी उतीर्ण असावा
३. अर्जदाराचे वय हे १८ ते ३५ मध्ये असावे.
४. अर्जदाराला बेसिक कॉम्पुटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे
हे प्रशिक्षण घेतल्यानंतर अस्थिव्यंग विद्यार्थी हे महिना १५००० ते २०००० रुपये कमवत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आता पर्यंत 35 अस्थिव्यंग युवक व युवतींचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
मो. 9422 66 3733
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान
स्वाधार अंध-अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, बुधोडा - लातूर